राहुल द्रविडच्या नम्र स्वभावाचा आणखी एक प्रसंग
Rahul DravidTeam Lokshahi

राहुल द्रविडच्या नम्र स्वभावाचा आणखी एक प्रसंग

सोशल मीडियावर राहुल द्रविडचा (Rahul Dravid)एक फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये तो एका पुस्तकाच्या दुकानात दिसत आहे. तो एका सामान्य माणसाप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात (Book Store)खुर्चीवर बसला असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे त्याच्या साधेपणामुळे त्याला तेथे कोणीच ओळखले नाही.सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीनुसार, राहुल द्रविड (Rahul Dravid)माजी खेळाडून गुणप्पा विश्वनाथ यांच्या नवा पुस्तकासंदर्भात चर्चा करण्यासाठी पोहचले होते. जीआर विश्वनाथ नविन पुस्तक रिस्ट यश्योर्डसंदर्भात चर्चा करण्यासाठी उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान, द्रविड मास्क परिधान करुन कार्यक्रम स्थळी पोहचले आणि गुपचुप मागीज बाजूस खुर्चीत जाऊन बसले. त्यांच्या या गुपचुपपणामुळे कोणालाच कोणालाच जाणीव झाली नाही की ते तिथं बसले आहेत. त्याच्या शेजारी एक महिला होती. तिला आपल्या शेजारी द्रविड बसलेत याची जाणीव देखील झाली नाही.

Rahul Dravid
आयपीएल 2022 च्या रेसमध्ये हे चार चॅम्पियन्स सगळयांना धोबीपछाड देत आले समोर

त्या महिलेने ट्विट करत द्रविडसोबत घडलेला किस्सा आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. जेव्हा लोकांना द्रविड उपस्थित असल्याची माहिती कळाली तेव्हा त्याच्या चाहत्यांनी धाव घेतली आणि ऑटोग्राफची मागणी केली.

Rahul Dravid
शिवाजी पार्कमध्ये रंगला ‘फ्रि हिट दणका’चा क्रिकेट सामना
Lokshahi
www.lokshahi.com