Andrew Symonds
Andrew SymondsTeam Lokshahi

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा अपघातात निधन

ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात निधन
Published by :
shamal ghanekar
Published on

ऑस्ट्रेलियाचा (Australia) ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा (Andrew Symonds) कार अपघातात निधन झाले आहे. वयाच्या 46 व्या वर्षी सायमंड्स याने अखेरचा श्वास घेतला आहे. अँड्र्यू सायमंड्सच्या कारला शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास हा आपघात झाला असून हा आपघात टाऊन्सविलेच्या पश्चिमेला 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंज येथे झाला आहे. या अपघातामध्ये माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स याचे निधन झालं आहे.

Andrew Symonds
गोविंदाच्या गाण्यावर पंजाबच्या संघाचा डान्स

क्वीन्सलँड (Queensland) पोलिसांनी सांगितले की, टाऊन्सविले शहराच्या पश्चिमेला असलेल्या हर्वे रेंज येथे रात्री 10:30 वाजता ही घटना घडली आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोचले. ही कार भरधाव वेगात असल्याने उलटल्याचे समजते आहे. या कारमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्स असून तो एकटाच गाडीमध्ये होता.

Andrew Symonds
राजस्थान रॉयल्सच्या ट्विटची सर्वत्र चर्चा

तात्काळ अँड्र्यू सायमंड्स याला रुग्णालय नेण्यात आले. डॉक्टरांनी सायमंड्सला वाचवण्याचा खूप प्रयत्न केले. परंतु हे प्रयत्न अपयशी ठरले. डॉक्टरांनी मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा अँड्र्यूला रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती नाजूक होती. अँड्र्यू सायमंड्स यांच्या निधनानंतर क्रिकेट (cricket) विश्वात शोककळा पसरली आहे. सायमंड्सच्या कुटुंबीय आणि चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com