Tilak Varma
Tilak VarmaTeam Lokshahi

सुनील गावस्कर यांनी केले मुंबईच्या तिलक वर्माचे कौतूक

तिलक वर्मा हा भारताचा सर्व फॉरमॅटमधील फलंदाज होणार
Published by :
Saurabh Gondhali

भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मुंबई इंडियन्सचा( Mumbai Indians) युवा फलंदाज तिलक वर्मा (Tilak Varma) याची तोंडभरून स्तुती केली. त्यांनी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मताशी सहमती दर्शवली. रोहित शर्माने तिलक वर्मा हा भारताचा सर्व फॉरमॅटमधील फलंदाज (India All Format Batsmen) होऊ शकतो असे वक्तव्य केले होते.

Tilak Varma
अजिंक्य रहाणेची आयपीएल मधून माघार, कारण

तिलक वर्मा हा आयपीएलमध्ये चमकलेला एक तारा आहे. त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना यंदाच्या हंगामात 12 सामन्यात 368 धावा केल्या आहेत. जरी मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी झाली नसली तरी त्यांना काही भविष्यातील खेळाडू गवसले आहेत. तिलक वर्मा बाबत बोलताना सुनिल गावसकर म्हणाले की, 'तिलक वर्माचे टेम्प्रामेंट हे जबरदस्त आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्ज विरूद्धच्या सामन्यात संघ दबावात असताना फलंदाजीला येत परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे हाताळली. त्याने प्रभावित केले.'

Tilak Varma
मुर्ती सापडल्यानंतरही ज्ञानवापी मशिदची जागा हिंदूना मिळणार नाही, कारण...

गावसकर तिलक वर्माच्या बॅटिंग तंत्राबाबत म्हणाले की, 'त्याचा पाया पक्का आहे. तांत्रिकदृष्ट्या तो योग्या आहे. तो चांगल्या प्रकारे बॉलच्या लाईनमध्ये येतो. त्याची बॅट सरळ खाली येते. फ्रंट फूटवर डिफेन्स करताना त्यांची बॅट आणि पॅड हे जवळ असतात. त्याचा पाया पक्का आहे. मात्र फक्त पाया पक्का असून चालणार नाही तर त्याच्या जोडीला टेम्प्रामेंटची देखील साथ हवी असते. सध्या तरी तिलक वर्माकडील बेसिक आणि टेम्प्रामेंट हे हातात हात घालून प्रवास करताना दिसत आहेत. हा प्रवास असाच पुढे सुरू रहावा अशी आशा आहे.'

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com