Ritika Sajdeh
Rohit Sharma's wife
Ritika Sajdeh Rohit Sharma's wife Team Lokshahi

Rishabh Pant Accident : ऋषभ पंतच्या अपघातानांतर रोहित शर्माची पत्नी रितीका भडकली

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या अपघाताच्या बातमीने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी सकाळी ऋषभ पंतच्या कारला अपघात झाल्याची बातमी आली आणि कारचे

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या अपघाताच्या बातमीने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी सकाळी ऋषभ पंतच्या कारला अपघात झाल्याची बातमी आली आणि कारचे फोटो पाहून लोकांचे मन हेलावले. प्रत्यक्षात त्यांची कार दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर कारने पेट घेतला. दरम्यान पंतच्या अपघातानंतर स्थानिकांनी त्याला मदत करत रुग्णालयात नेलं पण या दरम्यान पंतचे काही व्हिडीओ आणि फोटो उपस्थितांनी काढले जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावर कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह चिडली असून तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत आपला राग व्यक्त केला आहे.

रितिकाच्या इन्स्टाग्रामवरील स्टोरी, 'एखाद्या जखमी, दुखात असणाऱ्या व्यक्तीला त्याचे अपघातातील फोटो पोस्ट करायचे आहेत की नाही हे जाणून घेतल्याशिवाय ते शेअर करणं लाजिरवाणं आहे. त्याचे कुटुंबिय, मित्र-परिवार याना याने खूप त्रास होतो. ही चूकीची पत्रकारिता आहे.' 

Ritika Sajdeh
Rohit Sharma's wife
क्रिकेटर ऋषभ पंत याच्या अपघाताचे मुख्य कारण आले समोर

ऋषभ पंतच्या अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत आहेत. काही फोटोंमध्ये त्याच्या पाठीला झालेली दुखापत दिसत आहे. त्याचवेळी पंत काही व्हिडिओंमध्ये गंभीर जखमी झालेला दिसत आहे. सोशल मीडियावर असे फोटो आणि व्हिडिओ खूप शेअर होताना दिसत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com