IND vs SL, ODI
IND vs SL, ODI Team Lokshahi

टी-20 मालिका विजयानंतर भारतीय संघ वनडे मालिकेसाठी सज्ज

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली वनडे सीरिज 10 जानेवारीपासून सुरू होत आहे.

भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन T-20 सामन्यानंतर आता एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. उद्यापासून म्हणजे 10 जानेवारीपासून गुवाहाटी येथील बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार असून हा सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे. तर दुसरा सामना 12 जानेवारीला ईडन गार्डन्स, कोलकाता आणि तिसरा सामना 15 जानेवारीला स्टेडियम आंतरराष्ट्रीय (ग्रेन) स्टेडियम, तिरुवनंतपुरम येथे खेळला जाणार आहे.

टी 20 मालिकेत विश्रांती घेतलेल्या सीनियर खेळाडूंचे एकदिवसीय मालिकेमध्ये पुनरागमन होणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या खेळाडूंचे पुनरागमन होणार आहे.

IND vs SL, ODI
IND vs SL, 3rd T20I : तिसऱ्या टी- 20 सामन्यामध्ये कोण मारणार बाजी?

IND vs SL, ODI : एकदिवसीय सामन्यांसाठी दोन्ही संघ:

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंह.

श्रीलंका संघ : दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस, चारिथ अस्लंका, आशान बंडारा, वानिंदू हसरंगा, अविष्का फर्नांडो, नुवानिंदू फर्नांडो, चमिका करुणारत्ने, लाहिरू कुमरा, दिलशान मदुशंका, पथुम निसांका, प्रमोद मदुशान, सामुना राजविरा, कासून, महाराणी, महाराणी, नुवानिंदू फर्नांडो, जेफ्री वँडरसे, ड्युनिथ वेलाल्गे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com