उपांत्य फेरीत क्रोएशियाचा पराभव करून अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत प्रवेश
Admin

उपांत्य फेरीत क्रोएशियाचा पराभव करून अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत प्रवेश

लिओनेल मेस्सीच्या नेतृत्त्वात अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघानं फिफा विश्वचषक 2022 च्या फायनल्समध्ये जागा मिळवली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

लिओनेल मेस्सीच्या नेतृत्त्वात अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघानं फिफा विश्वचषक 2022 च्या फायनल्समध्ये जागा मिळवली आहे. यंदा अर्जेंटिनाकडे तिसरं विजेतेपद जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. अर्जेंटिना जेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर आहे. अर्जेंटिनानं आतापर्यंत 1978 आणि 1986 मध्ये दोनदा फिफाचं जेतेपद पटकावलं आहे.

अर्जेंटिनाचा कर्णधार मेस्सीनं सेमीफायनल्सचा सामना खेळून आणखी एक इतिहास रचला आहे. हा त्याचा विश्वचषकातील 25वा सामना होता.यंदाच्या फिफा विश्वचषकाची फायनल्स 18 डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी खेळवण्यात येईल. दिग्गज फुटबॉलर लिओनेल मेस्सीचा विश्वचषकातील हा 26वा सामना असेल.

या विश्वचषकाच्या सेमीफायनल्समध्ये मंगळवारी रात्री उशिरा अर्जेंटिनानं क्रोएशियाचा 3-0 असा पराभव केला. अर्जेंटिनानं 2014 नंतर पहिल्यांदाच फिफाची फायनल गाठली आहे. आता अर्जेंटिना यंदाच्या विश्वचषकावर आपलं नाव कोरणारण्यात यशस्वी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com