Arjun Tendulkar
Arjun TendulkarTeam Lokshahi

कोलकाताविरूद्ध सामन्यात अर्जुन तेंडुलकरचे आयपीएलमध्ये पदार्पण; याकारणाने मिळाली संघात जागा

अर्जुन तेंडुलकर गेल्या तीन हंगामांपासून मुंबई इंडियन्सचा भाग होता. मात्र, त्याला आज पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.

सध्या आयपीएल 2023 मोठा उत्साहात सुरू आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये आंनदाचे वातावरण आहे. याच आयपीएलमध्ये आजचा पहिला सामना मुंबई इंडिअन्स विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये होत आहे. या सामन्याआधी सचिन तेंडुलकरच्या फॅनसाठी मोठी आंनदाची बातमी समोर आली आहे. मुंबईची बॉलिंग प्रभावी नाही आणि त्यामध्ये जोफ्राच्या न खेळण्यामुळे एक पोकळी निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला या मुंबईच्या अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. अर्जुन तेंडुलकर गेल्या तीन हंगामांपासून मुंबई इंडियन्सचा भाग होता. मात्र, त्याला आज पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.

जोफ्रा आर्चर सामन्यातून बाहेर

जोफ्रा आर्चर 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध संघाचा पहिला सामना खेळला होता. परंतु, दुखण्यामुळे तो त्यानंतरच्या सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. त्यामुळे मुंबईचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आधीच या सामन्यातून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत जोफ्रा आर्चरच्या जागी अर्जुन तेंडुलकरला संधी मिळाली आहे.

आजचा मुंबई इंडियन्सचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, कॅमेरून ग्रीन, टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, टिळक वर्मा, झ्ये रिचर्डसन, पियुष चावला, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, कुमार कार्तीय , हृतिक शोकीन, जेसन बेहरेनडॉर्फ, डन्ने जॉन्सन, विष्णू विनोद, शम्स मुलानी, नेहल वढेरा, राघव गोयल, झ्ये रिचर्डसन आणि आकाश मधवाल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com