Video : अर्शदीप सिंग ठरला हिरो; 2 चेंडूत 2 स्टंप तोडले

Video : अर्शदीप सिंग ठरला हिरो; 2 चेंडूत 2 स्टंप तोडले

पंजाब किंग्जचा गोलंदाज अर्शदीप सिंगने क्रिकेटच्या मैदानावर चमत्कार केला. आयपीएल 2023 च्या 31 व्या सामन्यात अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीने काल सर्वांचीच मने जिंकली.

पंजाब किंग्जचा गोलंदाज अर्शदीप सिंगने क्रिकेटच्या मैदानावर चमत्कार केला. आयपीएल 2023 च्या 31 व्या सामन्यात अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीने काल सर्वांचीच मने जिंकली. अर्शदीपने 4 षटके टाकली आणि 29 धावांत 4 बळी घेतले. यात अर्शदीपने यॉर्करवर सलग 2 चेंडूत 2 फलंदाजांना बाद केले. एवढेच नाही दोन्ही चेंडूंवर स्टंप तुटले होते. हे दृश्य अनोखे होते.

पंजाब किंग्ज विरुध्द मुंबई इंडियन्स हा सामना शनिवारी खेळवण्यात आला. पंजाब किंग्जने 20 षटकांत 8 गडी गमावून 214 धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्स संघाला शेवटच्या षटकात 16 धावा करायच्या होत्या. फलंदाजीसाठी टिळक वर्मा आणि टिम डेव्हिड उपस्थित होते.

अर्शदीप सिंगने तिसर्‍याच चेंडूवर सरळ यॉर्कर टाकला व चेंडू सरळ जाऊन स्टंपला लागला आणि विशेष म्हणजे स्टंप तुटले. यानंतर आता नेहल वढेरा मैदानात उतरले. यावेळीही अर्शदीपने तोच यॉर्कर बॉल टाकला आणि चेंडू स्टंपच्या मध्यभागी जाऊन आदळला आणि स्टंप तुटला. हे दृश्य पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

दरम्यान, मुंबई इंडियन्स संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 201 धावा केल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com