BCCI निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचा राजीनामा

BCCI निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचा राजीनामा

BCCI निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचा राजीनामा दिला आहे.

BCCI निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचा राजीनामा दिला आहे. अलीकडेच चेतन शर्मा यांच्यावर एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन केले होते, अनेक बाबी समोर आल्या होत्या.BCCI निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादायक वक्तव्यं केली होती.

चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान, बीसीसीआयकडून कारवाई होण्याआधीच चेतन शर्मा यांनी पदाचा राजीनामा दिला.

चेतन शर्मा यांनी त्यांचा राजीनामा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडे सुपूर्द केला असून जय शाह यांनी चेतन शर्मा यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com