FIFA Awards 2023 : फिफा पुरस्कार सोहळ्यात लिओनेल मेस्सी ठरला सर्वोत्कृष्ट खेळाडू; पाहा पुरस्कारांची संपूर्ण यादी
Admin

FIFA Awards 2023 : फिफा पुरस्कार सोहळ्यात लिओनेल मेस्सी ठरला सर्वोत्कृष्ट खेळाडू; पाहा पुरस्कारांची संपूर्ण यादी

फिफा पुरस्कार सोहळ्यात लिओनेल मेस्सी हा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे.
Published on

फिफा पुरस्कार सोहळ्यात लिओनेल मेस्सी हा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. डिसेंबर महिन्यामध्ये कतारमध्ये फिफा वर्ल्ड कप स्पर्धा रंगली. यामध्ये अर्जेंटिना संघाने पहिलं विश्वचषक जिंकलं. दरम्यान सोमवारी फिफा पुरस्कार सोहळा पार पडला.

तर स्पेन संघाची ॲलेक्सिया पुटेलस सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू पुरस्काराची मानकरी ठरली आहे. यंदा फिफा विश्वचषकात अर्जेंटिनाचा संघ विश्वविजेता ठरला होता.

सर्वोत्कृष्ट फिफा फुटबॉल पुरस्कार विजेते

सर्वोत्तम फिफा पुरुष खेळाडू : लिओनेल मेस्सी

सर्वोत्कृष्ट फिफा महिला खेळाडू : अलेक्सिया

सर्वोत्तम फिफा महिला गोलकीपर : मेरी इर्प्स

सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष गोलकीपर : एमिलियानो मार्टिनेझ

सर्वोत्कृष्ट फिफा महिला प्रशिक्षक : सरिना विगमन

सर्वोत्तम फिफा पुरुष प्रशिक्षक : लिओनेल स्कालोनी

फिफा पुस्कास पुरस्कार : मार्सिन ओलेक्सी

फिफा फेअर प्ले अवॉर्ड : लुका लोचोशविली

फिफा फॅन अवॉर्ड : अर्जेंटिनियन चाहते

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com