मोठी बातमी! टेनिसपटूस्टार रॉजर फेडरर निवृत्त

मोठी बातमी! टेनिसपटूस्टार रॉजर फेडरर निवृत्त

रॉजर फेडररच्या नावावर 20 ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत

नवी दिल्ली : दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने याने खेळातून निवृत्तीची घोषणा केली आहे. रॉजर फेडररने ट्विटरवरद्वारे निवृत्तीची घोषणा केली आहे. लेव्हर कप स्पर्धेनंतर निवृत्ती घेणार आहे. या बातमीने त्याच्या लाखो चाहत्यांची मने तुटली आहेत. रॉजर फेडररच्या नावावर 20 ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत.

फेडरर म्हणाला की, गेली तीन वर्षे माझ्यासाठी कशी होती हे तुम्हाला माहितीच आहे. दुखापती आणि शस्त्रक्रियांच्या रूपात मी आव्हानांचा सामना केला आहे. परंतु, आता पूर्ण फॉर्ममध्ये परत येणे कठीण आहे,

मी 41 वर्षांचा आहे. मी 24 वर्षात 1500 हून अधिक सामने खेळले आहेत. मी कधीही कल्पना केली नव्हती त्यापेक्षा टेनिसने जास्त प्रेम मला मिळाले आहे. पुढील आठवड्यात लंडनमधील लेव्हर कप ही माझी शेवटची एटीपी स्पर्धा असेल. मी भविष्यात आणखी टेनिस खेळेन, अर्थातच, पण ग्रँडमध्ये नाही, असे त्यांनी ट्विटर पोस्टमध्ये लिहीले आहे.

दरम्यान, फेडररने 2003 मध्ये विम्बल्डनचे विजेतेपद पटकावताना पहिले ग्रँडस्लॅम जिंकले होते. त्यानंतर त्याने 6 ऑस्ट्रेलियन ओपन, 1 फ्रेंच ओपन, 8 विम्बल्डन आणि 5 यूएस ओपन विजेतेपदे जिंकली होती. फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच यांच्यानंतर जिंकलेल्या एकूण ग्रँडस्लॅम जेतेपदांच्या बाबतीत तो तिसर्‍या स्थानावर आहे.

Lokshahi
www.lokshahi.com