Pele Passes AwayTeam Lokshahi
क्रीडा
Pele Passes Away : ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचं निधन
ऑल टाइम ग्रेट फुटबॉलपटू अशी ओळख असलेले ब्राझीलचे महान खेळाडू पेले यांचे निधन झाले.
क्रिडा विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. महान फुटबॉलपटू पेले यांचं निधन झालं आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पेले यांनी तीनवेळा ब्राझील संघाला फिफा विश्वचषक जिंकून दिला होता. 1958,1962 आणि 1970 च्या फिफा विश्वचषक जिंकण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने क्रीडा विश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
गेल्या काही वर्षापासून ते कॅन्सरशी लढा देत होते. त्यांच्यावर साओ पाउलोच्या अलबर्ट आइन्स्टाइन रुग्णालयात उपचार सुरू होते. पेले यांच्या मुलीने इन्स्टाग्राम पोष्ट लिहून त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.
पेले यांना नियमीत तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची प्रकृती बिघडत गेली. सप्टेंबर 2021 मध्ये त्यांच्या शरीरातील कोलोन ट्यूमर हटवण्यात आला. त्यानंतर कीमो थेरेपी करण्यात आली होती.