ऋषभ पंतला मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी करणार मदत, उपचाराचा खर्च उत्तराखंड सरकार उचलणार

ऋषभ पंतला मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी करणार मदत, उपचाराचा खर्च उत्तराखंड सरकार उचलणार

क्रिकेटर ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. रुडकीच्या नारसन बॉर्डरवर हम्मदपूर येथे हा अपघात झाला.

क्रिकेटर ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. रुडकीच्या नारसन बॉर्डरवर हम्मदपूर येथे हा अपघात झाला. ऋषभची कार डिव्हाडरला धडकली. त्यानंतर कारने पेट घेतला. अपघातानंतर BMW कार जळून खाक झाली आहे. ऋषभ पंतच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला दिल्लीच्या रुग्णालयात तातडीने दाखल केले असून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ऋषभ पंतच्या उपचाराचा सर्व खर्च उत्तराखंड सरकार उचलणार असल्याचे सांगितले आहे. सीएम धामी यांच्या म्हणण्यानुसार, पंत यांना आवश्यकतेनुसार सर्व वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातील. त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतच्या मदतीसाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी पुढे आले आहेत. पंत यांच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, गरज पडल्यास त्यांना एअरलिफ्ट केले जाईल. सर्व वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातील. ऋषभ पंतच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com