Rishabh Pant Accident : क्रिकेटर ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात

Rishabh Pant Accident : क्रिकेटर ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात

क्रिकेटर ऋषभ पंत याच्या कारला अपघात

क्रिकेटर ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. रुडकीच्या नारसन बॉर्डरवर हम्मदपूर येथे हा अपघात झाला. ऋषभची कार डिव्हाडरला धडकली. त्यानंतर कारने पेट घेतला.  अपघातानंतर BMW कार जळून खाक झाली आहे. ऋषभ पंतच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला दिल्लीच्या रुग्णालयात तातडीने दाखल केले असून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे.

दिल्ली-डेहराडून महामार्गावर रेलिंगला धडकल्यानंतर ऋषभच्या कारला आग लागली. त्यानंतर परिसरातील उपस्थितांनी त्याला गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com