काय सांगता! कोट्यवधीचा मालक धोनी घेतोय केवळ 40 रुपयांमध्ये उपचार

काय सांगता! कोट्यवधीचा मालक धोनी घेतोय केवळ 40 रुपयांमध्ये उपचार

दिग्गज क्रिकेटर असूनही एका सामान्यांप्रमाणे धोनी उपचार घेत असल्याने सर्वच चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत.

रांची : महेंद्रसिंह धोनी साधेपणा नेहमीच चाहत्यांच्या मनाला भावत असतो. सध्याही तो आपल्या आजरासाठी कोणत्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये न जाता एका छोट्या गावात आयुर्वेदीक उपचार घेत आहे. याची उपचाराची फी केवळ 40 रुपये आहे. दिग्गज क्रिकेटर असूनही एका सामान्यांप्रमाणे धोनी उपचार घेत असल्याने सर्वच चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत.

महेंद्रसिंग धोनी अनेक महिन्यांपासून गुडघेदुखीच्या समस्येशी झुंज देत आहे आणि त्याच्या उपचारासाठी विविध पर्यायांचा तो शोध घेत होता. अशात रांचीपासून सुमारे 70 किमी अंतरावर असलेल्या लापुंगच्या घनदाट जंगलातील आयुर्वेदिक डॉक्टर वंदन सिंह खेरवार यांच्याकडून धोनी गुडघ्याच्या वेदनांवर उपचार घेत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, महेंद्रसिंग धोनीला कॅल्शियमच्या कमतरतेमुळे गुडघेदुखीचा त्रास असल्याचे सांगितले.

डॉ. वंदन सिंग खेरवार यांनी म्हंटले की, धोनीच्या आई-वडिलांवर आम्ही उपचार केले आहेत. त्यांच्यातील फरक पाहून धोनीने आश्रमात उपचार घेण्याचा निर्णय घेतला. मी धोनीकडून सल्ला फी म्हणून 20 रुपये घेतो आणि त्याला 20 रुपयांची औषधे लिहून देतो. धोनी एका सामान्य माणसांप्रमाणे कोणत्याही सुरक्षेशिवाय दर चार दिवसांनी आश्रमात येत असून महिनाभरापासून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, या भागात महेंद्रसिंग धोनी आल्याचे वृत्त समजताच त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये स्पर्धा लागते. धोनीही त्यांना दाद देत चाहत्यांसोबत फोटो काढून त्यांची इच्छा पूर्ण करतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com