फिफा वर्ल्ड कप : पंतप्रधान मोदींनी केलं अर्जेंटिनाच्या खेळाचं कौतुक म्हणाले...
Admin

फिफा वर्ल्ड कप : पंतप्रधान मोदींनी केलं अर्जेंटिनाच्या खेळाचं कौतुक म्हणाले...

कतार येथे झालेल्या विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव केला. तब्बल ३६ वर्षांनंतर त्याला विश्वचषक जिंकता आला आहे.
Published on

कतार येथे झालेल्या विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव केला. तब्बल ३६ वर्षांनंतर त्याला विश्वचषक जिंकता आला आहे. 1978 आणि 1986 नंतर त्याने आता तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. निर्धारित ९० मिनिटे सामना २-२ असा बरोबरीत राहिल्याने सामना अतिरिक्त वेळेत गेला. तिथे लिओनेल मेस्सीने गोल करून अर्जेंटिनाला ३-२ ने आघाडीवर नेले, पण कायलियन एमबाप्पेच्या मनात काही वेगळेच होते. त्याने 117व्या मिनिटाला गोल करून सामना 3-3 असा बरोबरीत आणला. यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने सामना जिंकला.

अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जेंटिनाचे अभिनंदन केले आहे. मोदी यांनी सोशल मिडियावर ट्विट करत अर्जेंटिनाचे कौतुक केलं आहे. सर्वात थरारक फुटबॉल सामना म्हणून हा लक्षात राहिल. फिफा वर्ल्ड कप २०२२ चे चॅम्पियन झाल्याबद्दल अर्जेंटिनाच्या संघाचे अभिनंदन.शानदार असा खेळ. अर्जेंटिना आणि मेस्सीच्या लाखो भारतीय चाहत्यांना आनंद झाला आहे. असे म्हणत मोदींनी कौतुक केलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com