Hardik abuse this player on the field
Hardik abuse this player on the fieldTeam Lokshahi

हार्दिकने केली या खेळाडूला भर मैदानात शिवीगाळ? व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल

श्रीलंकेच्या बॅटिंगदरम्यान 11 व्या ओव्हरमध्ये हा सर्व प्रकार घडला.

सध्या श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टी-20 मालिका जिंकल्यानंतर आता भारत आणि श्रीलंकामध्ये एकदिवसीय सुरु आहे. आज या दोन्ही संघात दुसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. याच सामन्यादरम्यान आज एक मोठा किस्सा घडला आहे. हार्दिकने वॉशिंग्टन सुंदरलाला भर मैदानात शिवी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

काही दिवसांपूर्वी दीपक हुड्डाने श्रीलंका विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात अंपायरसाठी अपशब्द वापरले होते. त्यानंतर उमरान मलिकने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या सामन्यात मोहम्मद सिराजने मिस फिल्ड केल्याने अपशब्द वापरले. तर आता हार्दिक पंड्याने नंबर लावला आहे. श्रीलंकेच्या बॅटिंगदरम्यान 11 व्या ओव्हरमध्ये हा सर्व प्रकार घडला. 11 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर हार्दिकचा या व्हायरल व्हीडिओत आवाज येतोय. “गेल्या ओव्हरमध्ये पाणी मागितले होते. तिथे काय @#…”, अशा शब्दात हार्दिकने वॉशिंग्टन सुंदरला शिवीगाळ केल्याचं चाहत्यांकडून सांगण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com