IND vs AUS 3rd Test : ऑस्ट्रेलियाचा भारतावर नऊ गडी राखून दणदणीत विजय
Admin

IND vs AUS 3rd Test : ऑस्ट्रेलियाचा भारतावर नऊ गडी राखून दणदणीत विजय

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या आजचा तिसरा सामना हा इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवला गेला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या आजचा तिसरा सामना हा इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवला गेला. यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर 9 गटी राखत विजय झाला आहे. विजयासाठी केवळ ७६ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताचा दुसरा डाव केवळ १६३ धावांवर संपुष्टात आला. लायनने भारताचे ८ गडी बाद केले.

लाबुशेन आणि हेड यांनी अनुक्रमे २८ आणि ४९ धावा करून ते नाबाद राहिले. केवळ अश्विनला १ गडी बाद करता आला.चेतेश्वर पुजाराने झुंजार अर्धशतक करत ५९ धावा केल्या.

तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला विजयासाठी अवघ्या ७६ धावांची आवश्यकता होती. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताच्या दोन्ही फिरकीपटूंनी शानदार गोलंदाजी केली. मात्र बॉर्डर-गावसकर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतावर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com