भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना; टीम इंडियामध्ये बदल; अशी असू शकते अंतिम 11?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना; टीम इंडियामध्ये बदल; अशी असू शकते अंतिम 11?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज टी20 सामना पार पडणार आहे. जो पहिला सामना झालेल्या त्यात भारताला 209 धावांचं लक्ष्य देऊनही पराभव पत्करावा लागल्यामुळे आज भारतीय संघात बदल होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पहिल्या टी20 सामन्यात मैदानात उतरलेल्या उमेश यादवने तब्बल 43 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला. अशामध्ये भारतीय संघाचा मुख्य गोलंदाज बुमराहची कमतरता सर्वांनाच जाणवली. त्यामुळे आता बुमराह संघात सामील होणार असल्याती शक्यता वर्तवण्यात येते आहे. उमेश यादवच्या जागी त्याला घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

कशी असू शकते अंतिम 11?

संभाव्य भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.

संभाव्य ऑस्ट्रेलिया संघ - आरोन फिंच (कर्णधार), जोस इंगलिस, स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिंस, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), कॅमरून ग्रीन, एडम झम्पा, टिम डेविड, जोस हेजलवुड, सीन एबॉट.

Lokshahi
www.lokshahi.com