भारताचा न्यूझीलंडवर १२ धावांनी विजय, मालिकेत १-० आघाडी
Admin

भारताचा न्यूझीलंडवर १२ धावांनी विजय, मालिकेत १-० आघाडी

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. १८ जानेवारी) हैदराबाद येथे झाला.

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. १८ जानेवारी) हैदराबाद येथे झाला. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात शतक झळकावलेल्या गिलने या सामन्यात आणखी एक मोठा पराक्रम करत द्विशतक साजरे केले. वन डे क्रिकेटमध्ये २०० धावा करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला.

रोहित शर्माने ३४(३८), सूर्यकुमार यादव ३१(२६), हार्दिक पांड्या ३८(२८) आणि वॉशिंग्टन सुंदर १२(१४) यांनाच केवळ गिल व्यतिरिक्त दोन आकडी धावसंख्या गाठता आली. तर विराट कोहली आणि इशान किशन अनुक्रमे अवघ्या ८ आणि ५ धावा करून बाद झाले. टीम इंडियाने शुबमन गिलचे द्विशतकाच्या जोरावर १२ धावांनी न्यूझीलंडवर विजय मिळवला. भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३४९ धावा केल्या.

रोहित शर्मा याच्यासह सलामीला आलेल्या शुबमन गिलने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी केली. त्याने न्यूझीलंडच्या सर्वच गोलंदाजांवर अक्षरशः वर्चस्व गाजवले. त्याने ८७ चेंडूवर शतकाला गवसणी घातली. त्यानंतर त्याने आपल्या खेळात अधिक आक्रमण आणत १४५ चेंडूंवर द्विशतक पूर्ण केले. यामध्ये १९ चौकार व ८ षटकारांचा समावेश होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com