IND vs SA 1st T20
IND vs SA 1st T20Team Lokshahi

IND vs SA 1st T20: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट्सनं विजय

भारताचा भेदक गोलंदाजीनंतर जबरदस्त फलंदाजीमुळे विजय प्राप्त
Published by :
Sagar Pradhan

भारतीय संघाने नुकताच ऑस्ट्रेलिया संघा विरुद्धची मालिका जिंकली आहे. त्यानंतर लगेचच दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर आहे. या मालिकेतील आज पहिला टी-20 सामना पार पडला. यात भारताचा सलामीवीर केएल राहुल आणि सूर्याकुमार यादवच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट्सनं विजय मिळवला आहे. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी भारताला 107 धावांच लक्ष्य दिलं होतं. टीम इंडियाने 20 चेंडू राखून आरामात हे लक्ष्य पार केलं. केएल राहुल नाबाद 51 आणि सूर्यकुमार यादवने नाबाद 50 धावांची खेळी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com