India Vs England T-20 World Cup Semi FinalTeam Lokshahi
क्रीडा
सेमी फायनलमध्ये भारतावर इंग्लंडचा दणदणीत विजय; भारताचं विश्वचषकाचं स्वप्न भंगलं
भारताने प्रथम फलंदाजी करताना 168 धावा केल्या.
T-20 विश्वचषकाचा आज सेमी फायनल सामना रंगली. या सामन्यामध्ये भारत विरुद्ध इंग्लंड असा थरार पाहायला मिळाला. इंग्लंडने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 168 धावा केल्या. तर, इंग्लंडसमोर 169 धावांचं आवहन ठेवलं.
इंग्लंडने फलंदाजी करताना एकही गडी न गमावता जॉस बटलर व अलेक्स हेल्स या दोघांच्या अप्रतिम खेळीच्या बळावर 169 धावांचं आवाहन सहज पेललं. --- चेंडू राखत इंग्लंडने भारतावर दणदणीत विजय मिळवला .
फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान असा थरार:
13 नोव्हेंबर रोजी रविवारी पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड असा अंतिम फायनल सामना रंगणार आहे. भारताचं विश्वचषकाचं स्वप्न आता भंगलं असल्याने भारतीय क्रिकेट चाहते पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तान संघाऐवजी इंग्लंडच्या संघाला समर्थन दर्शवण्याची शक्यता आहे.