Indian Squad
Indian SquadTeam Lokshahi

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ घोषित; या दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या मालिकेमध्ये काही खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे तर काही खेळाडूंना वगळण्यातही आले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या मालिकेमध्ये काही खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे तर काही खेळाडूंना वगळण्यातही आले आहे. शुक्रवारी बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 9 फेब्रुवारीला पहिला कसोटी मालिका खेळली जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील पहिल्या दोन कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यामध्ये भारतीय संघात रविंद्र जाडेजा, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांची निवड करण्यात आली आहे. तसेच दुखापतीनंतर रविंद्र जाडेजा संघात पुनरागमन होणार आहे.

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यांमध्ये कर्णधरपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपण्यात आली आहे. तर केएल राहुल उपकर्णधार असेल. ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या पहिल्या कसोटी मालिकेसाठी रविंद्र जाडेजाची निवड करण्यात आली आहे. पण तो फिटनेस टेस्ट पास झाला तर तो संघाचा भाग असणार आहे, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रविंद्र जाडेजा फिटनेस टेस्ट पास होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Indian Squad
न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा; 'या' खेळाडूंचे होणार पुनरागमन

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मज शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com