न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; 'या' तीन खेळाडूंचे पुनरागमन

न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; 'या' तीन खेळाडूंचे पुनरागमन

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पण, या भारतीय संघात फक्त 4 खेळाडूंनी तिन्ही संघात स्थान मिळवले आहे. यात शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि इशान किशन यांची नावे आहेत.

न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; 'या' तीन खेळाडूंचे पुनरागमन
कुस्तीगीरांच्या मानधनात तीनपटीने वाढ; फडणवीस यांची घोषणा

पृथ्वी शॉला अखेर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत संधी मिळाली. रणजी ट्रॉफीमध्ये आसामविरुद्ध खेळलेली ३७९ धावांची खेळी करत पृथ्वीने कमाल केली होती. रणजी इतिहासातील कोणत्याही मुंबईच्या फलंदाजाची ही दुसरी सर्वात मोठी खेळी आहे. यासोबतच पृथ्वीने काही काळ देशांतर्गत क्रिकेटमध्येही चमकदार कामगिरी केली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत केएल राहुल आणि अक्षर पटेल कौटुंबिक कारणांमुळे उपलब्ध होणार नाहीत. राहुलच्या जागी के एस भरतचा विकेट कीपर म्हणून भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पुनरागमन केले आहे. आशिया कप २०२२ पासून क्रिकेटपासून तो दूर होता.

त्याचवेळी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत जसप्रीत बुमराहला स्थान मिळालेले नाही. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे संघात बुमराहचाही समावेश होता. पण, प्रकृतीच्या कारणामुळे तो या मालिकेतूनही बाहेर होता.

सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले आहे. दोघांनी अद्याप कसोटीत पदार्पण केलेले नव्हते. परंतु, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात संधी मिळाल्याने दोघांच्या कुटुंबासाठी आणि चाहत्यांसाठी ही मोठी बातमी आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com