IND vs ENG
IND vs ENG Team Lokshahi

IND vs ENG : आज महामुकाबला; कोणाचा पारडं होणार जड?

आज (10 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषक 2022 मधील (T20 World Cup) दुसऱ्या सेमीफायनल सामन्यामध्ये भारत विरूद्ध इंग्लंड आमने-सामने असणार आहे.
Published by :
shamal ghanekar

आज (10 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषक 2022 मधील (T20 World Cup) दुसऱ्या सेमीफायनल सामन्यामध्ये भारत विरूद्ध इंग्लंड आमने-सामने असणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी 'करो या मरो' असा असणार आहे. भारत विरूद्ध इंग्लंड हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता अ‍ॅडलेड येथील अ‍ॅडलेड ओव्हल क्रिकेट स्टेडियम मैदानावर खेळवला जाणार आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्यामधील जिंकणारा संघ फायनलमध्ये पाकिस्तान संघासोबत खेळणार आहे. त्यामुळे कोणता संघ फायनलमध्ये जाणार याबाबत क्रिकेटप्रेमींमधील उत्सुकता शिंगेला लागली आहे. हा सामना दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. सुपर 12 फेरीमधील भारतीय संघाने 5 पैकी 4 सामने जिंकून सेमीफायनलमध्ये पोहचले. तर इंग्लंड संघाने 5 पैकी 3 सामने जिंकले आणि एक सामना अनिर्णीत झाला होता.

टी-20 विश्वचषक 2022 मधील दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत:

भारत : रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.

इंग्लंड : अ‍ॅलेक्स हेल्स, जोस बटलर, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, फिल सॉल्ट, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड/डेव्हिड विली.

IND vs ENG
IND Vs ZIM : झिम्बाब्वेवर भारताचा दणदणीत विजय, आता सेमीफायनलमध्ये देणार 'या' संघाला आवाहन

टी-20 विश्वचषक 2022 मधील अंतिम सामना कधी –

13 नोव्हेंबरला टी-20 विश्वचषक 2022चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना मेलबर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आज भारत विरूद्ध इंग्लंड हा महामुकाबला सामना होणार असून या सामन्यामधील जो संघ जिंकेल तो संघ पाकिस्तानविरुद्ध फायनल खेळणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघाची जोरदार तयारीही सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com