Virat Kohli 3rd Odi India Vs Sri lanka
Virat Kohli 3rd Odi India Vs Sri lankaTeam Lokshahi

श्रीलंकेच्या गोलंदाजांना विराटने धो,धो,धुतले... एकाच सामन्यात ठोकले एक शतक अन् अर्धशतक

विराट कोहली याने गेल्या 35 दिवसात तिसरं शतक ठोकलंय. तर श्रीलंका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील विराटचं हे दुसरं शतक.

भारतीय संघ आणि श्रीलंका यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका सुरु आहे. यामध्ये भारताने तीन सामान्यांच्या मालिकेत दोन सामने जिंकून आधीच मालिका आपल्या नावे केली आहे. आज होणाऱ्या या तिसऱ्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार आणि स्टार बॅट्समन विराट कोहली याने दमदार असं शतक झळकावत 74 वं आंतरराष्ट्रीय शतक आणि 46 वे अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्यांनी 110 चेंडूत 166 केल्या आहेत. यामुळे भारताने श्रीलंकेसमोर 390 धावांचे लक्ष दिले आहे.

विशेष म्हणजे मागील दोन वर्षे खराब फॉर्मात असणारा कोहली आता फॉर्मात परतल्यानंतर आहे. परंतु, यावेळी विराट प्रचंड आक्रमकपणे खेळत आहे. मागील चार एकदिवसीय सामन्यांत त्यानं तीन शतकं ठोकली आहेत. या शतकासोबत तो क्रिकेटर सचिन तेंडुलकर याच्या 100 शतकांच्या विक्रमाच्या आणखी एक पाऊल जवळ गेला आहे.

कोहलीसह, युवा सलामीवीर शुभमन गिल (116) यानेही वनडेत दुसरे शतक झळकावले कारण भारताच्या फलंदाजांनी मालिकेतील अप्रतिम अंतिम सामन्यात लंकन गोलंदाजांचा पराभव केला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेताना रोहित शर्मा आणि गिल यांनी शानदार सुरुवात केली पण 16व्या षटकात कर्णधार 42 धावांवर बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर कोहली आणि गिलने जबाबदारी सांभाळली आणि दुसऱ्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com