India Vs New Zealand
India Vs New ZealandTeam Lokshahi

निर्णायक सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर सोपा विजय, मालिकाही घेतली आपल्या ताब्यात

09 धावांचं माफक लक्ष्य केवळ 20.1 ओव्हरमध्ये दोन गडी गमावून पूर्ण केलं आणि 8 विकेट्सनी सामना जिंकला.

सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु आहे. आज या दोन्ही संघात निर्णायक सामना रायपूर येथे पार पडला. याच सामन्यात भारताने पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. तसेच पहिली सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत आता 2-0 ने पुढे आहे. हा विजय मिळवून भारताने मालिका देखील आपल्या नावी केली आहे. याच सामन्यात भारताच्या आक्रमक गोलंदाजीमुळे प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेला मात्र न्यूझीलंड संघ माफक 108 धावातच तंबूत परतला. त्यानंतर भारतीय संघ ध्येयाचा पाठलाग करताना फलंदाजीसाठी उतरला आणि न्यूझीलंडवर सोपा विजय प्राप्त केला.

109 धावांचं सोपं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारताची सुरुवातच दमदार झाली. कर्णधार रोहित शर्माने सलामीवीर शुभमन गिलसोबत अर्धशतकी भागिदारी केली. त्यानंतर रोहित शर्मानं आपले अर्धशतकही पूर्ण केलं. मात्र लगेचच 51 धावांवर रोहित बाद झाला. कोहलीही 11 धावा करुन बाद झाला. पण शुभमन शेवटपर्यंत मैदानात टिकून होता. त्याने नाबाद 40 तर ईशान किशनने नाबाद 8 धावा करत भारताचा विजय पक्का केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com