India Vs Sri Lanka 3rd Odi
India Vs Sri Lanka 3rd OdiTeam Lokshahi

श्रीलंकेला क्लीन स्वीप, तिसऱ्या वनडेत भारताचा दणदणीत विजय

भारताच्या 390 धावाच पाठलाग करताना अवघ्या, 73 धावांवर श्रीलंकेचा संघ तंबूत परतला.

भारतीय संघ आणि श्रीलंका यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका सुरु आहे. यामध्ये भारताने तीन सामान्यांच्या मालिकेत दोन सामने जिंकून आधीच मालिका आपल्या नावे केली आहे. परंतु, आज या दोन्ही संघात औपचारिक शेवटचा एकदिवसीय सामना पार पडला. याच सामन्यात भारताने मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. भारताच्या 390 धावाच पाठलाग करताना अवघ्या, 73 धावांवर श्रीलंकेचा संघ तंबूत परतला. त्यामुळे श्रीलंकेचा 371 धावांनी पराभव झाला. या विजयासह भारताने श्रीलंकेला क्लीनस्वीप दिला आहे. विराट कोहलीच्या दमदार खेळीमुळे भारताचा श्रीलंकेवर विजय सोपा झाला.

आजच्या या सामन्यात विराट प्रचंड आक्रमक भूमिकेत दिसला. विराटने श्रीलंकेच्या गोलंदाजांना चांगेलाच घाम फोडला. विराटनं 110 चेंडूत नाबाद 166 केला तर शुभमन गिलनं 116 धावांची खेळी केली. सर्वात आधी कर्णधार रोहित 46 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर कोहलीने गिलसोबत डाव सावरला. ज्यामुळे भारताने 50 षटकांत 390 धावा करत 391 धावांचे टार्गेट श्रीलंकेला दिले. 391 धावांचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेच्या फलंदाजाना चांगलीच कसरत करावी लागली. ज्यामुळे दुसऱ्या ओव्हरपासून त्यांचे गडी बाद होण्याचं सत्र सुरु झालं. ज्यानंतर 22 ओव्हरमध्ये 73 धावा करुन संपूर्ण संघ तंबूत परतला आणि भारतानं तब्बल 317 धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com