India Vs New Zealand
India Vs New Zealand Team Lokshahi

एकदिवसीय मालिकेत भारताचा न्यूझीलंडला क्लीन स्वीप

भारताने उत्कृष्ट कामगीरी करत न्यूझीलंडवर 90 धावांनी शानदार विजय मिळवला आहे.

सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका आज पार पडली. आज झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. तसेच या मालिकेत देखील न्यूझीलंडला भारताने क्लीनस्वीप दिला आहे. हा विजय मिळवून भारताने मालिका देखील आपल्या नावी केली आहे. या सामन्यात भारताने उत्कृष्ट कामगीरी करत न्यूझीलंडवर 90 धावांनी शानदार विजय मिळवला आहे.

भारताने न्यूझीलंडला विजयासाठी 386 धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला 41.2 ओव्हरमध्ये 295 धावांवरत ऑलआऊट केलं. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 138 धावांची खेळी केली. तर हेनरी निकोलसने 42 रन्स केल्या. या दोघांव्यतिरिक्त भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना मैदानात फार टिकू दिलं नाही. आणि सामन्यात न्यूझीलंडवर 90 धावांनी शानदार विजय मिळवला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com