India Vs Sri lanka 2nd Odi
India Vs Sri lanka 2nd OdiTeam Lokshahi

दुसऱ्या सामन्यात भारताचा श्रीलंकेवर विजय, सामना जिंकून मालिका केली नावी

राहुलच्या संयमी अर्धशतकाने सामना भारताने जिंकला.
Published by :
Sagar Pradhan

कोलकात्याच्या ईडन गार्डन्स येथे आज भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसऱ्या एकदिवसीय निर्णायक सामना पार पडला. एकापाठोपाठ दुसऱ्या सामन्यात भारताने जोरदार विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताने 4 गडी राखून विजय मिळवला आहे. राहुलच्या आणि पांड्याच्या खेळीमुळे हा विजय भारतीय संघाच्या पारड्यात पडला.

या सामन्यात नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर 215 धावा करत 216 धावांचं लक्ष्य त्यांनी भारतीय संघाला दिलं. परंतु, फलंदाजीसाठी उतरलेला भारतीय संघातील वरची फळी सोप्यात बाद झाली. त्यामुळे हा सामना रंगतदार झाल्याचे पाहायला मिळाले. अखेर राहुलच्या संयमी अर्धशतकाने सामना भारताने जिंकला. पांड्यानेही राहुलला चांगली साथ दिली. ज्यामुळे भारताने 6 गडी गमावत 43.2 षटकात निर्धारीत लक्ष्य पूर्ण केले. तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत भारताने दोन सामने जिंकल्यामुळे भारताने ही मालिका आपल्या नवी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com