indian team jersey
indian team jerseyTeam Lokshahi

T20 World Cup 2022 भारतीय संघाची नवीन जर्सी लाँच

मुंबईमध्ये झाले अनावरण

आशिया चषकानंतर आता लगेचच पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात टी 20 विश्वचषकाचा थरार क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळणार आहे. त्याआधी भारतीय संघाची जर्सी लाँच करण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे टीम इंडियाची जर्सी निळ्या रंगाची आहे. या जर्सीत विशेष म्हणजे तीन स्टार लावण्यात आले आहे. विश्वचषकासाठी तयार करण्यात आलेल्या खास जर्सीचे मुंबईमध्ये अनावरण झालंय. सोशल मीडियावर जर्सीचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

काय आहे विशेष या जर्सीत?

विश्वचषकासाठी लाँच करण्यात आलेल्या जर्सीवर तीन स्टार आहेत. भारतीय संघाने आतापर्यंत तीन विश्वचषक जिंकले आहेत. त्यामुळे जर्सीवर तीन स्टार आहेत.

असा असणार टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, यूजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.

राखीव खेळाडू- मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर.

Lokshahi
www.lokshahi.com