India vs Australia
India vs Australia Team Lokshahi

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा 6 गडी राखून विजय

रोहितची 46 धावांची दमदार खेळी

पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला होता. त्यानंतर आज दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत बरोबरी केली आहे. सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाबाद 46 धावांची विजयचा मानकरी ठरला आहे. पावसामुळे 8 षटकांच्या झालेल्या सामन्यातप्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 91 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर या धावांचा सामना करत भारताने 4 गडी गमावत 7.2 षटकात पूर्ण करत सामना 6 विकेट्सने जिंकला आहे. आता मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया 1-1 च्या बरोबरीत आहे.

Lokshahi
www.lokshahi.com