India Vs Australia
India Vs AustraliaTeam Lokshahi

ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारूण पराभव; वनडे मालिकेत दोन्ही संघ आता बरोबरीत

118 धावांचे आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियांने 10 विकेट्स राखून भारतावर विजय मिळवला आहे.

भारताने कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय मालिका सुरु आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर या मालिकेतील आज दुसरा पार पडला. या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने दिलेल्या माफक 118 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्स राखून विजय मिळवला. यामुळे मालिकेत दोन्ही संघ आता 1-1 ने बरोबरीत आले आहेत.

विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी दिली. मात्र, फलंदाजीसाठी उतरलेला भारतीय संघ अडचणीत असल्याचा दिसून ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजी समोर भारताने अवघ्या 26 ओव्हरमध्ये 117 धावा करत आपली खेळी संपवली. विराट कोहली याने सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादव, शुबमन गिल, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी हे चौघेही शून्य धावाकरत तंबूत परतले. त्यानंतर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 11व्या षटकातच धावांचा पाठलाग केला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने 30 चेंडूत 51 धावा आणि मिचेल मार्शने 36 चेंडूत 66 धावा केल्या. सोबतच ऑस्ट्रेलियाने 234 चेंडू शिल्लक ठेवत 10 गडी राखून भारताचा पराभव केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com