IPL 2023 : आयपीएलच्या 16व्या हंगामाला आजपासून सुरुवात; गुजरात-चेन्नई येणार आमने -सामने
Admin

IPL 2023 : आयपीएलच्या 16व्या हंगामाला आजपासून सुरुवात; गुजरात-चेन्नई येणार आमने -सामने

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) फिव्हर सध्या संपूर्ण क्रिकेट विश्वात पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) फिव्हर सध्या संपूर्ण क्रिकेट विश्वात पाहायला मिळत आहे. आगामी हंगाम सुरू होण्यासाठी २४ तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, ज्यामध्ये ३१ मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेते गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात पहिला सामना खेळवला जाईल. या हंगामात एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत.

आयपीएल 2023 च्या १६ व्या हंगामात अहमदाबाद, मोहाली, लखनौ, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी आणि धर्मशाला या शहरात सामने होणार आहेत. या हंगामात एकूण 74 सामने होणार असून 10 संघांमध्ये लीग टप्प्यातील 70 सामने होतील, तर उर्वरीत 4 सामने प्लेऑफचे असतील. पहिला सामना आज (31 मार्च) चेन्नई आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर संध्याकाळी 6 वाजल्यापासून थेट प्रक्षेपित केला जाईल. दोन्ही संघांच्या एकमेकांविरुद्धच्या विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर चेन्नई आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत 2 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाने दोन्ही वेळा विजय मिळवला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com