आयपीएल 2023  लिलाव : चार खेळाडू मालामाल, 15 कोटींहून अधिक रुपयांची बोली

आयपीएल 2023 लिलाव : चार खेळाडू मालामाल, 15 कोटींहून अधिक रुपयांची बोली

काल (24 डिसेंबरला ) आयपीएल 2023 चा लिलाव झाला. एकूण १० संघ लिलावाच्या मैदानात उतरले होते. तरी काही मोजक्या जागा भरण्यासाठी कमालीची चुरस लागली होती.

काल (24 डिसेंबरला ) आयपीएल 2023 चा लिलाव झाला. एकूण १० संघ लिलावाच्या मैदानात उतरत असले, तरी काही मोजक्या जागा भरण्यासाठी कमालीची चुरस अपेक्षित होती. ट्वेंटी-२० विश्वकरंडक विजेत्या इंग्लंड संघातील प्रमुख खेळाडू बेन स्टोक्स आणि सॅम करन यापैकी एकावर अधिक बोली लागण्याची शक्यता होती. हा लिलाव कोचीमधील फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडला. आयपीएलच्या लिलावात चार खेळाडू मालामाल झाले असून त्यांच्यावर 15 कोटींहून अधिक रुपयांची बोली लागली आहे.

ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून ग्रीवर मुंबई इंडियन्सने 17.5 कोटी रूपयांची बोली लावली. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने बेन स्टोक्सला 16.25 कोटी रूपये बोली लावली. चेन्नई सुपर किंग्ज या संघात खेळणारा सॅम आता पंजाब किंग्जकडून खेळणार आहे. पंजाबने त्याच्यावर बरेच पैसे मोजले आहेत. पंजाबने तब्बल 18.50 कोटी रुपयांना सॅमला संघात सामिल केलं आहे. निकोलस पुरनला लखनौ सुपर जायंटने 16 कोटी रूपयाला खरेदी केले.

आयपीएल 2023च्या लिलावात महागडे ठरलेले खेळाडू

18.50 कोटी- सॅम करन (पंजाब किंग्स)

17.5 कोटी- कॅमरून ग्रीन (मुंबई इंडियन्स)

16.25 कोटी- बेन स्टोक्स (चेन्नई सुपर किंग्स)

16 कोटी- निकोलस पूरन (लखनऊ सुपर जायंट्स)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com