आज आयपीएल 2023 चा लिलाव, कोण होणार मालामाल?

आज आयपीएल 2023 चा लिलाव, कोण होणार मालामाल?

आज आयपीएल 2023 चा लिलाव होणार आहे. एकूण १० संघ लिलावाच्या मैदानात उतरत असले, तरी काही मोजक्या जागा भरण्यासाठी कमालीची चुरस अपेक्षित आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज आयपीएल 2023 चा लिलाव होणार आहे. एकूण १० संघ लिलावाच्या मैदानात उतरत असले, तरी काही मोजक्या जागा भरण्यासाठी कमालीची चुरस अपेक्षित आहे. ट्वेंटी-२० विश्वकरंडक विजेत्या इंग्लंड संघातील प्रमुख खेळाडू बेन स्टोक्स आणि सॅम करन यापैकी एकावर अधिक बोली लागण्याची शक्यता आहे. हा लिलाव कोचीमधील फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडणार आहे.

आयपीएल मिनी लिलावामुळे संघांना त्यांच्या संघात काही नवीन चेहरे जोडण्याची संधी मिळते. टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघातील अनेक स्टार खेळाडूंवर बाजी मारण्याची शक्यता आहे. यामध्ये हॅरी ब्रूकसारख्या युवा स्टार्सचा समावेश आहे. लिलावादरम्यान संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होण्याची शक्यता आहे. या लिलावात एकूण 405 खेळाडूंचा सहभाग असणार आहे. ज्यामध्ये 273 भारतीय आणि 132 परदेशी आहेत आणि 10 फ्रँचायझींसह एकूण 87 जागा रिक्त आहेत.

405 खेळाडूंपैकी 273 भारतीय आहेत तर 132 परदेशी खेळाडू देखील आहेत. यातील अनेक खेळाडूंना भरघोस रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे. आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंनी आपले चांगले करिअर घडवले आहे. यावेळी लिलावात सनरायझर्स हैदराबादकडे सर्वाधिक 42.25 कोटी रुपये आहेत.

संघ शिल्लक रक्कम खेळाडूंच्या रिक्त जागा

सनरायजर्स हैदराबाद 42.25 कोटी 13

कोलकाता नाइट रायडर्स 7.05 कोटी 11

लखनऊ सुपर जायंट्स 23.35 कोटी 10

मुंबई इंडियन्स 20.55 कोटी 9

पंजाब किंग्ज 32.02 कोटी 9

राजस्थान रॉयल्स 13.2 कोटी 9

चेन्नई सुपर किंग्ज 20.45 कोटी 7

गुजरात जायंट्स 19.25 कोटी 7

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु 8.75 कोटी 7

दिल्ली कॅपिटल्स 19.45 कोटी 5

लिलाव कुठे पाहू शकता?

स्टार स्पोर्ट्सवर IPL 2023 मिनी लिलाव थेट पाहू शकता. Viacom 18 च्या Voot अॅपवर लाइव्ह स्ट्रीमिंग होईल. IPL 2023 चा लिलाव कोची येथे होणार असून आज दुपारी 2.30 वाजता सुरू होईल.

सर्वात महागडे खेळाडू

16 कोटी - युवराज सिंग (दिल्ली डेअरडेव्हिल्स - 2015)

15.25 कोटी - इशान किशन (मुंबई इंडियन्स - 2022)

15.5 कोटी - पॅट कमिन्स (कोलकाता नाइट रायडर्स - 2020)

15 कोटी - काइल जेमिसन (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - 2021)

14.5 कोटी - बेन स्टोक्स (रायझिंग पुणे सुपरजायंट्स - 2017)

14.25 कोटी - ग्लेन मॅक्सवेल (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - 2021)

14 कोटी - युवराज सिंग (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - 2014)

16.25 कोटी - ख्रिस मॉरिस (राजस्थान रॉयल्स - 2021)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com