RCB Vs DC
RCB Vs DCTeam Lokshahi

IPL 2023 RCB vs DC: बंगळुरूचा दिल्लीवर 23 धावांनी विजय, दिल्लीचा सलग पाचवा पराभव

कोहलीच्या पाठोपाठ बंगळुरूचा गोलंदाजांनी केले चमत्कार

आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना पार पडला. याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 23 धावांनी दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत आपला दुसरा विजय प्राप्त केला. तर दुसरीकडे दिल्लीला दिल्लीला सलग पाचव्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्लीला अद्याप विजयाचे खाते उघडता आले नाही. त्यामुळे या पराभवासह दिल्लीची प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

RCB Vs DC
CSK :तमिळनाडू विधानसभेत चेन्नई सुपर किंग्जवर बंदी घालण्याची मागणी, काय आहे नेमकं कारण वाचा

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर सहा गडी गमावून १७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीच्या संघाला नऊ गडी गमावून केवळ 151 धावा करता आल्या आणि सामना 23 धावांनी गमवावा लागला. कोहलीशिवाय बंगळुरूकडून महिपाल लोमरने 26 धावा केल्या. त्याचवेळी दिल्लीकडून कुलदीप यादव आणि मिचेल मार्शने प्रत्येकी दोन गडी बाद केले. दिल्लीकडून मनीष पांडेने सर्वाधिक 50 धावा केल्या. नॉर्टजेनेही 23 धावांची खेळी खेळली. आरसीबीच्या विजयकुमारने तीन आणि सिराजने दोन गडी बाद केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com