IPL 2023 Mini Auction: आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये 405 खेळाडूंवर लागणार बोली

IPL 2023 Mini Auction: आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये 405 खेळाडूंवर लागणार बोली

आयपीएल 2023 साठी मिनी लिलाव 23 डिसेंबर रोजी होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आयपीएल 2023 साठी मिनी लिलाव 23 डिसेंबर रोजी होणार आहे. यावेळी जगभरातून ९९१ खेळाडूंनी लिलावात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली होती. मात्र अंतिम यादीत 405 खेळाडू आहेत. या 405 खेळाडूंपैकी 273 भारतीय आणि 132 बाहेरचे आहेत. आयपीएल 2023 साठी 87 स्लॉट रिक्त आहेत, ते भरण्यासाठी 405 खेळाडूंवर बोली लावली जाईल. या मिनी लिलावात खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात पैशांचा वर्षाव होणार आहे. पण काही खेळाडू असे आहेत जे यावेळी लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडू शकतात. भारतीय वेळेनुसार, दुपारी 2.30 वा. मिनी ऑक्शनला सुरुवात होणार आहे. यंदाच्या आयपीएलसाठी अफगाणिस्तानचा 15 वर्षीय फिरकी गोलंदाजी अल्लाह मोहम्मदनं मिनी ऑक्शनसाठी नोंदणी केलीय. यंदाच्या मिनी ऑक्शमध्ये नोंदणी करणारा अल्लाह मोहम्मद सर्वात तरुण खेळाडू असेल. मोहम्मदनं यावर्षी ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्येही आपलं नाव नोंदवलं होतं.

कोची येथे होणाऱ्या या मिनी ऑक्शनमध्ये भारताचे एकूण 273 खेळाडू असतील. तर, इंग्लंडचे 27 खेळाडू, दक्षिण आफ्रिकेचे 22 खेळाडू, ऑस्ट्रेलियाचे 21 खेळाडू, वेस्ट इंडिजचे 20 खेळाडू, न्यूझीलंडचे 10 खेळाडू, श्रीलंका आणि अफगाणिस्तानचे 8 खेळाडू, आयर्लंडचे 4 खेळाडू, बांगलादेशचे 4 खेळाडू, झिम्बाब्वेचे 2 खेळाडू, नामिबियाचे 2 खेळाडू, नेदरलँड आणि यूएई यांच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश करण्यात आलाय.

आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात, सर्व फ्रँचायझी बेन स्टोक्सचा त्यांच्या संघात समावेश करू इच्छितात. जुनी फ्रेंचाइजी राजस्थान रॉयल्सही त्याच्यावर सट्टा लावू शकते. याशिवाय बेन स्टोक्सला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स फ्रँचायझी पाण्यासारखा पैसा खर्च करतील. सध्या बेन स्टोक्स जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अलीकडेच त्याने आपल्या संघाला टी-२० विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याआधी 2019 मध्येही त्याने आपल्या संघाला 50 षटकांचा विश्वचषक जिंकून दिला होता. फलंदाजीसोबतच स्टोक्स गोलंदाजीतही कमाल करतो. त्यामुळे सर्व फ्रँचायझी त्याच्यावर लक्ष ठेवून असतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com