Inida Vs Sri lanka
Inida Vs Sri lanka Team Lokshahi

भारतीय संघाला मोठा धक्का! भारताचा घातक गोलंदाज श्रीलंकासोबतच्या वनडे मालिकेतून बाहेर

जसप्रीत बुमराह बऱ्याच दिवसांपासून दुखापतीशी झुंज देत आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये सध्या T-20 आणि एकदिवसीय मालिका सुरु आहे. यामध्ये भारताने T-20 मालिकेत श्रीलंकेवर विजय मिळवला आहे. T-20 सामन्यानंतर आता एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. उद्यापासून म्हणजेच 10 जानेवारीपासून गुवाहाटी येथील बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. मात्र, त्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा घातक गोलंदाज जसप्रीत बुमराह एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे.

जसप्रीत बुमराह बऱ्याच दिवसांपासून दुखापतीशी झुंज देत आहे. यामुळे तो आशिया चषक २०२२ आणि टी२० विश्वचषक २०२२ मध्ये सहभागी होऊ शकला नाही. तो आता पूर्णपणे फिट आहे. मात्र, बीसीसीआय त्याला अधिक विश्रांती देऊ इच्छित आहे.

असा असेल भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com