जसप्रीत बुमरा विश्वचषकाला मुकणार; ‘बीसीसीआय’ची घोषणा

जसप्रीत बुमरा विश्वचषकाला मुकणार; ‘बीसीसीआय’ची घोषणा

ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबरपासून ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा सामना रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्याच्या पूर्वसंध्येला (२७ सप्टेंबर) झालेल्या भारताच्या सराव सत्रादरम्यान बुमराने पाठदुखीची त्रास झाला.
Published by :
Siddhi Naringrekar

ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबरपासून ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा सामना रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्याच्या पूर्वसंध्येला (२७ सप्टेंबर) झालेल्या भारताच्या सराव सत्रादरम्यान बुमराने पाठदुखीची त्रास झाला. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा पाठीच्या दुखापतीमुळे आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळू शकणार नाही अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी दिली आहे.

यासोबतच त्यांनी सांगितले की, ‘बुमरा ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचे ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीत पथकाने स्पष्ट केले आहे. वैद्यकीय अहवालाचे मूल्यांकन आणि तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे,’’ अशी त्यांनी माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच जसप्रीत बुमराहची दुखापत गंभीर असून तो विश्वचषक स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नसल्याचे समोर आले होते. पण बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले होते.

जसप्रीत बुमरा विश्वचषकाला मुकणार; ‘बीसीसीआय’ची घोषणा
T20 World Cup 2022: स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टी-20 विश्वचषकातून बाहेर
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com