MI vs LSG :  मुंबईचा लखनऊवर 81 धावांनी दणदणीत विजय
Admin

MI vs LSG : मुंबईचा लखनऊवर 81 धावांनी दणदणीत विजय

मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा ८१ धावांनी पराभव केला.

मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा ८१ धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सने १८२ धावा केल्या आणि लखनऊचा संघ केवळ १०१ धावाच करू शकला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या आकाश मधवालने शानदार गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. आकाशने १.४२ च्या स्ट्राइक रेटने ३.३ षटकात केवळ ५ धावा देत सर्वाधिक ५ बळी घेतले.

कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक ४१ धावा केल्या. मुंबईने २० षटकांत ८ गडी गमावून १८२ धावा केल्या आणि मुंबईला १८३ धावांचे लक्ष्य दिले.लखनऊचा संघ १६.३ षटकात १०१ धावांवर सर्वबाद झाला. लखनऊचा संघ सलग दुसऱ्यांदा प्लेऑफमध्ये पराभूत होऊन बाहेर पडला. 

विजय मिळवून आता मुंबईने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवले आहे. आता २६ मे रोजी जगातील सर्वात मोठे स्टेडियम, अहमदाबाद, मुंबई येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गतविजेत्याचा सामना होणार आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com