Mumbai Indians New Jersey: आयपीएलच्या नव्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने लॉन्च केली नवी जर्सी; पाहा फोटो
Admin

Mumbai Indians New Jersey: आयपीएलच्या नव्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने लॉन्च केली नवी जर्सी; पाहा फोटो

आयपीएलच्या नव्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने नवी जर्सी लॉन्च केली आहे.

आयपीएलच्या नव्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने नवी जर्सी लॉन्च केली आहे. मुंबई इंडियन्स ट्विट करत नव्या जर्सीचे फोटो शेअर केले आहेत.येत्या 31 मार्चपासून आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. 28 मेपर्यंत आयपीएलचा सामने असणार आहेत.

याशिवाय पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सची जर्सी चाहत्यांनाही खरेदी करता येणार आहे. आपलं नाव आणि आवडत्या नंबरसह चाहते ही जर्सी खरेदी करु शकणार आहेत. आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना 2 एप्रिलला खेळणार असून रॉयल चॅलेंजर्स बंगलोरशी त्यांचा सामना असणार आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ

रोहित शर्मा (C), ईशान किशन, जसप्रीत बुमराह, कॅमरून ग्रीन, जाये रिचर्ड्सन, कुमार कार्तिकेय, ट्रिस्टन स्टब्स, पीयुष चावला, अर्जुन तेंडुलकर, ऋतिक शोकिन, जोफ्रा आर्चर, मोहम्मद अरशद खान, तिलक वर्मा, रमनदीप सिंह, टिम डेव्हिड, डेवॉल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, आकाश मधवाल, शम्स मुलानी, जेसन बेहरनडॉर्फ, नेहल वधेरा, विष्णू विनोद, राघव गोयल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com