जॉर्जियात टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या तनिशा कोटेचाची चमकदार कामगिरी
Admin

जॉर्जियात टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या तनिशा कोटेचाची चमकदार कामगिरी

जॉर्जियात टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या तनिशा कोटेचाने चमकदार कामगिरी केली आहे. 17 आणि 19 वर्षांखालील दोन्ही वयोगटांत अंतिम फेरीत धडक मारत रजतपदके पटकावली आहेत.

जॉर्जियात टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या तनिशा कोटेचाने चमकदार कामगिरी केली आहे. 17 आणि 19 वर्षांखालील दोन्ही वयोगटांत अंतिम फेरीत धडक मारत रजतपदके पटकावली आहेत. जून 2022 मध्ये केरळ येथील अलपुझा येथे पार पडलेल्या 83 व्या ज्युनिअर आणि युवा राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात नाशिकच्या तनिषा कोटेचा हिने विजय मिळत राष्ट्रीय चॅम्पियन पटकावले होते.

19 वर्षांखालील मुलींच्या गटात उपांत्य फेरीत तनिशाने हाँगकाँग चायनाच्या ली हुई मन करेन हिचा 3-1 असा सहज पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात हाँगकाँग चायनाच्याच काँग तत्झ लाम हिच्याकडून तनिशाचा 3-2 असा पराभव झाल्याने उपविजेतेपदासह रजतपदक मिळाले. निशा ही प्रशिक्षक जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

स्पर्धेच्या 17 वर्षांखालील मुलींच्या गटात तनिशाने उपांत्य फेरीत इराणच्या एक्ता आदिबियणचा 3-1 ने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत तिचा सामना हाँगकाँग चायनाची वांग हुई तुंग हिच्याबरोबर झाला. या सामन्यात तनिशाचा 3-1 असा पराभव झाल्याने तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com