IND Vs NZ 1st ODI
IND Vs NZ 1st ODITeam Lokshahi

न्यूझीलंडने 7 गडी राखून भारतावर मिळवला दणदणीत विजय

शिखर धवन-शुभमन गिल यांची अर्धशतकी खेळी व्यर्थ

भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. त्यातच टी- २० मालिका भारताने जिंकल्यानंतर आज भारत आणि न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिकेला सुरवात झाली. मात्र, या पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. हा पहिला एकदिवसीय सामना न्यूझीलंडच्या ऑकलंड येथे पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने जबरदस्त फलंदाजीचं दर्शन घडवत 307 धावांचं आव्हान केवळ 47.1 षटकांत तीन गडी गमावून पूर्ण करत भारतावर 7 विकेट्सनी विजय मिळवला आहे.

मालिकेतील पहिल्याच सामन्यात विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेतही किवींनी 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आधी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय न्यूझीलंडने केला. ज्यानंतर भारताने सलामीवीर शिखर धवन-शुभमन गिल यांच्या अर्धशतकांसह श्रेयस अय्यरच्या 80 धावांच्या जोरावर 306 धावां केल्या. ज्या न्यूझीलंडने टॉम लेथमच्या नाबाद 145 आणि कर्णधार केनच्या नाबाद 94 धावांच्या जोरावर पूर्ण करत सामना जिंकला.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com