Babar Azam
Babar AzamTeam Lokshahi

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अडचणीत, अश्लिल व्हिडीओ अन् चॅट व्हायरल

बाबर आझम हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावाही चाहत्यांकडून करण्यात येत आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्याबाबतीत मोठी बातमी समोर आली आहे. बाबरचे एका महिलेसोबतच्या चॅटिंगचे आणि खाजगी फोटो सध्या सोशल मिडीयावर सध्या व्हायरल होत आहे. महिलेबरोबर बोलतानाचा बाबर आझमचा व्हिडीओ आणि स्क्रीन शॉट व्हायरल झाला. यामुळे सोशल मिडियावर सध्या याबाबत प्रचंड चर्चा सुरु आहे. बाबर आझम हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावाही चाहत्यांकडून करण्यात येत आहे.

eish. arajpoot या युजरनी बाबरसोबतचं चॅट आणि व्हिडीओ शेअर केले. इन्स्टाग्रामशिवाय ट्वीटरवरही अनेकांनी बाबरचा खासगी व्हिडीओ आणि चॅट पोस्ट केले आहेत. ट्विटरवर अनेकांनी असा दावा केलाय की व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती बाबर आझम असून तो एका मुलीसोबत व्हिडिओ चॅट करताना दिसत आहे. एका इंस्टाग्राम पोस्टचा स्क्रीनशॉट देखील शेअर करण्यात आला होता, जो eish.arajput1 अकाऊंटवरुन पोस्ट केल्याचं दिसतेय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com