Pakistan vs South Africa
Pakistan vs South AfricaTeam Lokshahi

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा दणदणीत विजय

आज टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरूद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना खेळण्यात आला होता. यासामन्यामध्ये पाकिस्तानचा 33 रन्सने विजय झाला आहे.

आज टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरूद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना खेळण्यात आला होता. यासामन्यामध्ये पाकिस्तानचा 33 रन्सने विजय झाला आहे. या टी-20 वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा हा पहिला पराभव होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात यश आले नाही.

पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरूद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यामध्ये पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करून 185 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 43 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर शादाब खान आणि इफ्तिखार अहमद यांच्या चांगल्या खेळीने पाकिस्तानला 185 धावा करण्यात यश आले .

Pakistan vs South Africa
Ind Vs Ban: पावसाने भारताची चिंता वाढवली, DLS नियमानुसार बांग्लादेश 17 धावांनी पुढे

मात्र दक्षिण आफ्रिकेला 185 धावा करण्यात अपयश आले आहे. आजच्या सामन्यामध्ये पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला ३३ धावांनी पराभूत केले आहे. सुरुवातीपासून पाकिस्तानच्या गोलंदाजांनी आफ्रिकेला ताब्यात ठेवलं. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकाचा कर्णधार टेंबा बावुमा 36 आणि एडन मार्करम 20 धावा करण्यात यश मिळाले. तसेच दक्षिण आफ्रिकाची फलंदाजी सुरू असताना पावसाचीनेही हजेरी लावली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com