Ravindra Jadeja
Ravindra JadejaTeam Lokshahi

IND vs AUS: रवींद्र जडेजाने बॉलसोबत केली छेडछाड?

रवींद्र जडेजा याने नागपूरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस गाजवला.

रवींद्र जडेजा याने नागपूरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस गाजवला. जडेजाने 5 महिन्यांनी कमबॅक करत ऑस्ट्रेलियाच्या टॉपच्या 5 फलंदाजांना आऊट केलं. यामुळे ऑस्ट्रेलिया बॅकफुटवर गेली. त्यानंतर जडेजाची बॉलिंग ही चर्चेचा विषय ठरला. मात्र आता सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओत जडेजा बॉलसोबत छेडछाड करत असल्याचं म्हटलं जात आहे.

हा व्हीडिओ टीम पेन यानेही शेअर केला आहे. ज्यात जडेजा बॉलिंग टाकण्याआधी मोहम्मद सिराज याच्याकडे जातो. सिराजच्या हातावर मलमसदृश पदार्थ असतो. तो पदार्थ जडेजा बोटाने घेतो. जडेजा तो पदार्थ ज्या हाताने बॉल टाकतो त्या हातावरील बोटाला लावला. मात्र जडेजाने बॉलसोबत छेडछाड केल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान जडेजाने एकूण 22 ओव्हर टाकल्या. या 22 ओव्हरमध्ये त्याने 8 षटकं ही निर्धाव टाकली. तर 47 रन्स देत 5 महत्तवपूर्ण विकेट्स घेतल्या. जडेजाने मार्नल लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब आणि टॉड मर्फी या पाच जणांचा आऊट काढला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com