मोठी बातमी !  चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार जडेजा

मोठी बातमी ! चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार जडेजा

क्रिकेटपटू रविंद्र जडेजा गेल्यावर्षी दुखापतीमुळे अर्ध्यातच उर्वरित आयपीएलमधून बाहेर पडला हाता
Published by  :
Team Lokshahi

क्रिकेटपटू रविंद्र जडेजा गेल्यावर्षी दुखापतीमुळे अर्ध्यातच उर्वरित आयपीएलमधून बाहेर पडला असताना त्याने टीम सोडल्याची बातमी सर्वत्र पसरली परंतू यावर्षी देखील जडेजा सीएसके कडून खेळणार असल्याचा खुलासा टीम मॅनेजमेंनेट केला.

गेल्या आयपीएल हंगामाच्या सुरुवातीला जडेजाकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. संघ व्यवस्थापन आणि धोनीसोबत झालेल्या वादानंतर त्याने मध्यंतरी संघ सोडला आणि परतला. त्याने नंतर दुखापतीचा हवाला दिला. त्याचवेळी त्यांनी सोशल मीडियावरून सीएसकेशी संबंधित सर्व पोस्ट हटवल्या होत्या. त्यानंतर तो सीएसके सोडणार अशा चर्चा होत्या. यावर सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन म्हणाले की, जडेजा हा संघाचा महत्त्वाचा सदस्य असुन तो फ्रँचायझीसोबत असेल. आणि टीमच नेतृत्व महेंद्र सिंह धोनीकडून केले जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान रवींद्र जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. आशिया चषक 2022 मध्ये तो केवळ 2 सामने खेळून बाहेर पडला होता. यानंतर त्याच्यावर या दुखापतीची शस्त्रक्रियाही झाली आणि तेव्हापासून तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) होता. नूकत्याच बांग्लादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत रवींद्र जडेजाचा समावेश करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com