ऋषभ पंतच्या अपघाताच CCTV फुटेज आलं समोर
Admin

ऋषभ पंतच्या अपघाताच CCTV फुटेज आलं समोर

क्रिकेटर ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. रुडकीच्या नारसन बॉर्डरवर हम्मदपूर येथे हा अपघात झाला.

क्रिकेटर ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. रुडकीच्या नारसन बॉर्डरवर हम्मदपूर येथे हा अपघात झाला. ऋषभची कार डिवायडरला धडकली. त्यानंतर कारने पेट घेतला. अपघातानंतर BMW कार जळून खाक झाली आहे. ऋषभ पंतच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला दिल्लीच्या रुग्णालयात तातडीने दाखल केले असून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे.

ऋषभची कार डिवायडरला धडकली. पंतची कार या धडकेनंतर पलटली. त्यानंतर कारला आग लागली. पंत कसाबसा कारच्या बाहेर पडला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. ऋषभला या अपघातात गंभीर जखमा झाल्या आहेत.

 ऋषभ पंतच्या अपघाताच CCTV फुटेज आलं समोर
ऋषभ पंतला मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी करणार मदत, उपचाराचा खर्च उत्तराखंड सरकार उचलणार

ऋषभ पंतच्या अपघाताच सीसीटीव्ही फुटेज समोर आलय. अपघाताच्यावेळी ऋषभची कार किती वेगात होती, ते या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतय. ऋषभ पंत स्वत: कार ड्राइव्ह करत होता.

 ऋषभ पंतच्या अपघाताच CCTV फुटेज आलं समोर
क्रिकेटर ऋषभ पंत याच्या अपघाताचे मुख्य कारण आले समोर
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com