वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा कर्णधार होणार नाही? सुनील गावस्कर यांचे मोठे वक्तव्य
Admin

वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा कर्णधार होणार नाही? सुनील गावस्कर यांचे मोठे वक्तव्य

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्मा नसेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्मा नसेल. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत अष्टपैलू हार्दिक पांड्या संघाचा कर्णधार असेल. मात्र, रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत पुनरागमन करेल. म्हणजेच मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा संघाचा कर्णधार असेल. मात्र, भारताचा माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर मोठे वक्तव्य केले आहे.

रोहित शर्मा एकदिवसीय विश्वचषक 2023 पर्यंत संघाचा कर्णधार असेल, परंतु या स्पर्धेनंतर हार्दिक पांड्याला भारतीय टी-20 आणि एकदिवसीय संघाचा नियमित कर्णधार बनवले जाईल. रोहित शर्माला हटवून ही जबाबदारी स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे सोपवली जाऊ शकते. असे त्यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com